जिल्हा

उल्हासनगर मनसे शहरप्रमुख संजय घुगे यांचा भाजपात प्रवेश

उल्हासनगर मनसे शहरप्रमुख संजय घुगे यांचा भाजपात प्रवेश
उल्हासनगर मनसे शहरप्रमुख संजय घुगे यांचा भाजपात प्रवेश फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा–मनसे युती जाहीर झालेली असतानाच उल्हासनगरात मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे उल्हासनगर शहर प्रमुख संजय घुगे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
काल भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला. भाजप मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष कपिल आडसुळ यांच्या पुढाकाराने संजय घुगे यांनी भाजपाची सदस्यता स्वीकारली. या राजकीय घडामोडीमुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात असून, मनसेसाठी तो मोठा धक्का असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
यावेळी भाजपचे माजी शहर अध्यक्ष प्रदीप रामचंदानी, कपिल आडसुळ, निलेश बोबडे यांच्यासह इतर भाजप  कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600