जिल्हा

अनधिकृत बांधकामांच्या तोंडचे पाणी पळाले

अनधिकृत बांधकामांच्या तोंडचे पाणी पळाले
अनधिकृत बांधकामांच्या तोंडचे पाणी पळाले फोटो: ठाणे वैभव
दिवा परिसरात १४ नळ जोडण्या खंडित, १० पंप जप्त, ११ बोअरवेल केल्या बंद ठाणे: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने अनधिकृत इमारती आणि चालू बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये यासाठी कडक पावले उचलली होती. आता अशा बांधकामांच्या नळ जोडण्या खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या १४ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तसेच १० मोटर पंप जप्त करण्यात आले असून ११ बोअरवेल बंद करण्यात आल्या आहेत. अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावीत. तसेच, बांधकाम अवैध असल्यास नळसंयोजन तत्काळ खंडीत करण्यात यावे, त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरुन अवैधरित्या नळसंयोजन घेतले असल्यास तेही तातडीने खंडीत करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी पुरवठा विभागास दिले आहेत. त्या अनुषंगाने दिवा प्रभाग समिती क्षेत्रात २५ आणि २६ जुलै रोजी अनधिकृत बांधकामांची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता (पाणी पुरवठा विभाग) विनोद पवार यांनी दिली. या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसेच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पंपही जप्त करण्यात आले असून काही ठिकाणी बोअरवेलही बंद करण्यात आल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. दिवा प्रभाग समिती क्षेत्रात शिळ-महापे रोड परिसर, दातिवली रोड, शांती नगर, मुनीर कम्पाऊंड या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600