जिल्हा

वासिंद-पिवळी-कांबरे रस्ता खड्ड्यांत हरवला

वासिंद-पिवळी-कांबरे रस्ता खड्ड्यांत हरवला
वासिंद-पिवळी-कांबरे रस्ता खड्ड्यांत हरवला फोटो: ठाणे वैभव
वाहनचालकांची रोजची जीवघेणी कसरत शहापूर: ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा वासिंद-पिवळी-कांबरे मार्ग सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डेमय झाला असून रस्त्यावर जणू खड्ड्यांचीच रांगोळी पडल्याचे चित्र दिसत आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत. दुचाकीस्वारांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताची भीतीही वाढली आहे. ॲन्युइटी हायब्रीड योजनेअंतर्गत मिलन इंटरप्रायझेस कंपनीने बांधला आहे. करारानुसार या रस्त्याची दहा वर्षे देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर आहे. मात्र रस्ता बांधून अवघी चार वर्षे झाली असतानाच पहिल्याच जोरदार पावसात मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अद्याप सहा वर्षांचा देखभाल कालावधी शिल्लक असतानाही आवश्यक दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या मार्गावर वाडा तालुक्यातील अबिटघर, कुडूस, खुपरी, कंचाड आदी औद्योगिक परिसर असल्याने मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. तसेच दहागाव, पिवळी, सावरोली आणि भिवंडी तालुक्यातील केल्हे या गावांतील नागरिकही दैनंदिन प्रवासासाठी याच रस्त्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे खड्डेमय रस्त्यामुळे स्थानिक नागरिक, कामगार, विद्यार्थी आणि प्रवासी यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली असून दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित कंपनी व प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600