जिल्हा

लोकलच्या लगेज डब्यात दोन गटांमध्ये तुफान राडा

लोकलच्या लगेज डब्यात दोन गटांमध्ये तुफान राडा
लोकलच्या लगेज डब्यात दोन गटांमध्ये तुफान राडा फोटो: ठाणे वैभव
लोखंडी कड्याने हल्ला, तिघे जखमी, दोघांची प्रकृती गंभीर कल्याण : धावत्या अंबरनाथ लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित हाणामारीत झाले. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे मध्यरात्री लोकलमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलच्या लगेज डब्यात सीटवर बसण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. यावेळी एका गटाने लोखंडी कड्याने हल्ला केल्याचा आरोप आहे.या हल्ल्यात राजू वाघे (19), साहिल खंदारे (19) आणि प्रितेश कनोजिया (31) हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेनंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून, हल्ल्यात सहभागी आरोपींचा शोध घेतला जात आहे. धावत्या लोकलमध्ये झालेल्या या हिंसक प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600