जिल्हा

पाच गृहसंकुलांना पाणी; दिवाळीआधी गॅसजोडणी

जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात तक्रारी मार्गी ठाणे: भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घोडबंदर आणि कोलशेत परिसरातील पाच गृहसंकुलांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला तर चरई, खारकर आळी, मासुंदा परिसरासह इतर भागातील १५०हून जास्त कुटुंबांना गॅस जोडणी दिवाळीआधीच मिळणार असल्याची माहिती श्री.केळकर यांनी यावेळी दिली. ठाण्यातील हाईड पार्क, हिरानंदानी इस्टेट, धर्मवीरनगर, मरीआई नगर कोलशेत, कॉसमॉस या गृहसंकुलांत पाण्याची टंचाई गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत असून त्यांच्या प्रतिनिधींनी आ.संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उपस्थित राहून भेट घेतली. महापालिकेची पाणीपट्टी भरूनही पाणी अपुरे मिळत आहे, शिवाय टँकरपोटी देखील हजारो रुपये नाहक खर्च होत असल्याची तक्रार त्यांनी केली. श्री.केळकर यांनी पाणी विभागातील अधिकारी श्री.कुलकर्णी आणि विनोद पवार यांना बोलावून घेतले. पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तोडगा काढण्याबाबत आश्र्वासित केले. आज झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात आ. केळकर यांच्याकडे शैक्षणिक विभाग, बदली विषय, परिवहन कर्मचारी, सफाई कामगार, ठामपा वारस हक्क, पाणी, रबर इंडिया कंपनी, वर्तकनगर प्रभाग समिती, नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत विषय, वृक्षप्राधिकरण विभाग अशा विविध विषयांच्या तक्रारी आ. केळकर यांच्याकडे प्राप्त झाल्या. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रमात ठामपा कर्मचाऱ्यांनी वारस हक्क विषय मार्गी लावल्याबाबत सत्कार केला. कामगार वर्गाचे आ. केळकर यांनी आतापर्यंत अनेक महत्वाचे विषय मार्गी लावले आहेत. यावेळी या जनसंवाद कार्यक्रमात भाजपा चे माजी नगरसेवक दीपक जाधव, सुरेश कांबळे, भाजपा उपाध्यक्ष महेश कदम, युवा मोर्चा अध्यक्ष सुरज दळवी, दत्ता घाडगे, योगेश भंडारी, मेघनाथ घरत, राजेश गाडे, आशिष कळसकर उपस्थित होते. शहरातील दहा हजार सदनिकांना महानगर गॅस जोडणी देण्याचा संकल्प आमदार संजय केळकर यांनी केला असून आतापर्यंत पाच हजारहून अधिक कुटुंबांना ही सुविधा देण्यात यश मिळाले आहे. तर येणाऱ्या दिवाळी आधीच चरई, खारकर आळी, मासुंदा परिसर, मनोरमा नगर, यशस्वी नगर, हायलॅन्ड स्प्रिंग सोसायटी, द आयकॉन सोसायटी, माजिवडे गाव, ब्रह्मांड बीएसयुपी इमारत, सिद्धिविनायक सोसायटी ढोकाळी आदी भागात दिवाळीआधीच गॅस जोडणी होणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600