जिल्हा

विकासकामे करताना राजकारण, मतभेद बाजूला ठेऊन सहकार्य अपेक्षित

विकासकामे करताना राजकारण, मतभेद बाजूला ठेऊन सहकार्य अपेक्षित
विकासकामे करताना राजकारण, मतभेद बाजूला ठेऊन सहकार्य अपेक्षित फोटो: ठाणे वैभव
खासदार डॉ. शिंदे यांचे प्रतिपादन अंबरनाथ: अंबरनाथमध्ये विकास कामे करताना यापूर्वी विरोधकांनीही राजकारण केले नाही, त्यामुळे विकासकामे होऊ शकली, नागरिकांच्या मनातील सर्व गैरसमज दूर करून साई विभागातील अटल उद्यानाचा विकास साधला जाणार असून सर्वांनी या कामाला सहकार्य करावे, असे आवाहन खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांनी केले. अंबरनाथमधील विकास कामांची पाहणी करण्यासाठी सोमवार 5 ऑक्टोबर रोजी खासदार डॉ. शिंदे यांनी अंबरनाथला भेट दिली. प्राचीन शिवमंदिर येथे सुरू असलेल्या शिवमंदिर परिसर सुशोभीकरण कामाची त्यांनी पाहणी केली. पाच कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. साई विभागातील अटल उद्यानाच्या होणाऱ्या विकास कामांची पाहणी करून त्यांनी परिसरातील नागरिकांशी परिसंवाद साधला. नियोजित अटल उद्यानात उद्यानात करण्यात येणाऱ्या विकास कामांवरून स्थानिकांनी विविध कामांची मागणी केली. उद्यान बंदिस्त असावे, उद्यानात गैरप्रकार होऊ नयेत, उद्यान विनामूल्य असावे, शुल्क आकारू नये, उद्यानाशेजारी असलेल्या भगिनी मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मैदान उपलब्ध असावे, बॅडमिंटनसाठी सोय असावी, रेनवॉटर हार्वेस्टिंग,तरण तलाव आदी प्रकारच्या सोयी असण्याची गरज उपस्थितांनी बोलून दाखवली. माजी नगरसेविका अनिता आदक, माजी नगरसेविका अपर्णा भोईर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनीही यावेळी उद्यानाच्या सुशोभीकरण कामाबाबत मत व्यक्त केले. खासदार डॉ. शिंदे यांच्या संकल्पनेतून उद्यानाचा विकास करण्यात येणार असल्याचे सुनील चौधरी म्हणाले. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी खासदार डॉ. शिंदे यांनी चर्चा करून उद्यानाच्या सुशोभीकरण कामात काही सुधारणा सुचवल्या. अंबरनाथच्या शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण कामाने वेग घेतला आहे, नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असल्याचे खा.डॉ. शिंदे यांनी नमूद केले. कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,, माजी नगराध्यक्ष मनिषा वाळेकर, भाजपाचे गुलाबराव करंजुले-पाटील, विश्वजित करंजुले पाटील, माजी नगरसेवक कुणाल भोईर, अपर्णा भोईर, भाजपाचे संजय आदक आदी महायुतीचे पदाधिकारी, पालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आदी याप्रसंगी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600