जिल्हा

इमारतीचा सज्जा कोसळून महिला ठार, एक जखमी

इमारतीचा सज्जा कोसळून महिला ठार, एक जखमी
इमारतीचा सज्जा कोसळून महिला ठार, एक जखमी फोटो: ठाणे वैभव
मुंब्र्यात लकी कंपाऊंडमध्ये मध्यरात्रीची घटना ठाणे : मुंब्र्यातील दौलत नगर येथील लकी कंपाऊंड इमारतीच्या डी-विंगमधील सज्जाचा काही भाग कोसळल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत इमारतीच्या बाजूने जाणाऱ्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यापैकी एका वृद्ध महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्या जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंब्र्यातील दौलत नगर येथील लकी कंपाऊंडमधील डी-विंग ही इमारत तळ अधिक ३ मजली आणि एक टेरेस रूम आहे. ही इमारत अंदाजे २५ वर्षे जुनी असून, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रूम नंबर ४०४ ही सदनिका रेहान फर्जानी यांच्या मालकीची आहे. या घराच्या बाहेरील सज्जाचा काही भाग कोसळला. यावेळी इमारतीच्या बाजूने जात असलेल्या दोन महिलांवर हा भाग कोसळला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. इलमा जमाली (२६) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर मुंब्रा येथील काळसेकर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. तर, नाहिद जमाली (६२) यांचा गंभीर दुखापतीमुळे मुंब्रा येथील बिलाल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दोन्ही महिला सना टॉवर, मदिना मशीद जवळ, कौसा कब्रस्तान परिसरात राहत होत्या. इमारतीच्या सज्जाचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच मुंब्रा अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तसेच मुंब्रा प्रभाग समितीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. धोकादायक ठरलेला सज्जा आणि रूम नंबर ४०४ मधील विंडो ग्रील अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी तत्काळ हटवला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण इमारत रिकामी करून सील करण्यात आली आहे, तसेच रहिवाशांनी तात्पुरती राहण्याची व्यवस्था स्वतःच्या नातेवाईकांकडे केली आहे. या घटनेच्या पुढील तपासासाठी मुंब्रा प्रभाग समिती व अतिक्रमण विभाग कार्यरत असून, भविष्यातील अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600