कमी दर, घरगुती चव आणि दर्जेदार पदार्थ यामुळे हॉटेल व्यावसायिक, राजकीय नेते, नोकरदार वर्ग तसेच सामान्य नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, मायभूमीपासून दूर असलेल्या परदेशातील नागरिकांना या घरगुती फराळातून गावाकडच्या चविचा आणि दिवाळीच्या आठवणींचा आनंद घेता येत असल्यामुळे या उपक्रमाला विशेष लोकप्रियता मिळत आहे. या महिला बचत गटात नामदेव वाडी, सिद्धेश्वर तलाव, पाटील वाडी, रमाबाई नगर या भागातील महिलांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. या महिलांनी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या लाडक्या बहिण योजनेचे दीड हजार रुपये बचत गटात गुंतवले आहेत. त्याच पैशातून त्यांनी हा व्यवसाय निर्माण केला असून इतर महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला. "रोजगारासाठी मुंबईकडे पाहण्याऐवजी, स्वतः काही तरी निर्माण करा आणि इतर महिलांनाही रोजगार द्या" असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या संदेशातून प्रेरणा मिळाली असे महिलांनी सांगितले.
“दसरा, दिवाळी, गणेशोत्सव अशा विविध सणांच्या निमित्ताने आम्ही नवनवीन उपक्रम राबवत आहोत. यामधून महिलांना आर्थिक स्थैर्य मिळत असून आत्मविश्वास देखील वाढतो, असे बचत गटाच्या जया कुंभेकर यांनी सांगितले. “गेल्या १० वर्षांपासून आम्ही नागरिकांना दर्जेदार सेवा देत आहोत. महिलांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वतःसाठी आणि इतरांसाठी रोजगाराची दारे खुली करावीत, असे गटाच्या सदस्य सुवर्ण खेरटकर यांनी सांगितले.
जिल्हा
फराळावर शून्य जीएसटी; महिला बचत गटांची दिवाळी

फोटो: ठाणे वैभव
ठाणे : दुकानांमधील फराळाच्या पदार्थांवर १२टक्के जीएसटी आकारला जात असल्यामुळे प्रतिकिलो सुमारे ४० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. याउलट बचत गटांमार्फत बनवलेल्या घरगुती फराळावर जीएसटी लागू न झाल्यामुळे हे पदार्थ स्वस्तात उपलब्ध होत असून नागरिकांचा कल याच घरगुती फराळाकडे वाढला आहे.
दिवाळी म्हटली की फराळ आलाच. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत घरी फराळ तयार करणे सर्वांना शक्य होत नाही. परिणामी, तयार फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. ठाण्यातील “जय जय रघुवीर समर्थ” आणि “सावित्री” या दोन महिला बचत गटांनी यंदा दिवाळीनिमित्त पारंपरिक फराळ तयार केला असून, ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात बचतगटाकडून ५०० किलोहून अधिक फराळ तयार केला असून त्यासाठी जवळपास ५० हून अधिक महिला मेहनत घेत आहेत. गेल्या वर्षी या महिलांनी जवळपास 400 किलो फराळाची विक्री केली होती. मात्र यंदा मागणी वाढल्याची माहिती महिला बचत गटाने दिली. महिला बचत गटातील महिलांनी भाजणी चकली, पोहे चिवडा, शंकरपाळी, लाडू, करंजी आदी पारंपरिक पदार्थ २०० ते ५०० रुपये प्रति किलो दराने विक्रीस ठेवले आहेत.
कमी दर, घरगुती चव आणि दर्जेदार पदार्थ यामुळे हॉटेल व्यावसायिक, राजकीय नेते, नोकरदार वर्ग तसेच सामान्य नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, मायभूमीपासून दूर असलेल्या परदेशातील नागरिकांना या घरगुती फराळातून गावाकडच्या चविचा आणि दिवाळीच्या आठवणींचा आनंद घेता येत असल्यामुळे या उपक्रमाला विशेष लोकप्रियता मिळत आहे. या महिला बचत गटात नामदेव वाडी, सिद्धेश्वर तलाव, पाटील वाडी, रमाबाई नगर या भागातील महिलांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. या महिलांनी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या लाडक्या बहिण योजनेचे दीड हजार रुपये बचत गटात गुंतवले आहेत. त्याच पैशातून त्यांनी हा व्यवसाय निर्माण केला असून इतर महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला. "रोजगारासाठी मुंबईकडे पाहण्याऐवजी, स्वतः काही तरी निर्माण करा आणि इतर महिलांनाही रोजगार द्या" असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या संदेशातून प्रेरणा मिळाली असे महिलांनी सांगितले.
“दसरा, दिवाळी, गणेशोत्सव अशा विविध सणांच्या निमित्ताने आम्ही नवनवीन उपक्रम राबवत आहोत. यामधून महिलांना आर्थिक स्थैर्य मिळत असून आत्मविश्वास देखील वाढतो, असे बचत गटाच्या जया कुंभेकर यांनी सांगितले. “गेल्या १० वर्षांपासून आम्ही नागरिकांना दर्जेदार सेवा देत आहोत. महिलांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वतःसाठी आणि इतरांसाठी रोजगाराची दारे खुली करावीत, असे गटाच्या सदस्य सुवर्ण खेरटकर यांनी सांगितले.
कमी दर, घरगुती चव आणि दर्जेदार पदार्थ यामुळे हॉटेल व्यावसायिक, राजकीय नेते, नोकरदार वर्ग तसेच सामान्य नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, मायभूमीपासून दूर असलेल्या परदेशातील नागरिकांना या घरगुती फराळातून गावाकडच्या चविचा आणि दिवाळीच्या आठवणींचा आनंद घेता येत असल्यामुळे या उपक्रमाला विशेष लोकप्रियता मिळत आहे. या महिला बचत गटात नामदेव वाडी, सिद्धेश्वर तलाव, पाटील वाडी, रमाबाई नगर या भागातील महिलांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. या महिलांनी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या लाडक्या बहिण योजनेचे दीड हजार रुपये बचत गटात गुंतवले आहेत. त्याच पैशातून त्यांनी हा व्यवसाय निर्माण केला असून इतर महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला. "रोजगारासाठी मुंबईकडे पाहण्याऐवजी, स्वतः काही तरी निर्माण करा आणि इतर महिलांनाही रोजगार द्या" असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या संदेशातून प्रेरणा मिळाली असे महिलांनी सांगितले.
“दसरा, दिवाळी, गणेशोत्सव अशा विविध सणांच्या निमित्ताने आम्ही नवनवीन उपक्रम राबवत आहोत. यामधून महिलांना आर्थिक स्थैर्य मिळत असून आत्मविश्वास देखील वाढतो, असे बचत गटाच्या जया कुंभेकर यांनी सांगितले. “गेल्या १० वर्षांपासून आम्ही नागरिकांना दर्जेदार सेवा देत आहोत. महिलांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वतःसाठी आणि इतरांसाठी रोजगाराची दारे खुली करावीत, असे गटाच्या सदस्य सुवर्ण खेरटकर यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600