दोघांनीही ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव, बाळकूम येथे नियमित सराव केला, तर आठवड्याच्या शेवटी उरण परिसरात समुद्रात प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. स्वराजला प्रशिक्षण आरती प्रधान आणि नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. तसेच स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉ. काश्मिरा कोर्डे यांनीही साथ दिली. वंशिकाने यापूर्वी २०२४ मध्ये श्रीलंकेतील तलाईमन्नार ते भारतातील धनुष्कोडी दरम्यानच्या २३ किमी ‘पाल्क स्ट्रेट’ रिले स्विममध्ये सहभाग घेत इतिहास घडवला होता.
ओपन वॉटर सी स्विमिंग चॅलेंज’ या मोहिमेचे आयोजन संतोष पाटील व त्यांच्या टीमने केले होते. या स्पर्धेनंतर उरण येथे पार पडलेल्या पुरस्कार समारंभात माजी सरपंच हितेश कोळी, माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, तसेच आंतरराष्ट्रीय विंड सर्फिंग सुवर्णपदक विजेते राज पाटील आणि जयेश पाटील यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. खुल्या समुद्रातील जलतरण हा भारतात तुलनेने कमी परिचित खेळ असला, तरी स्वराज आणि वंशिका यांनी दाखवलेल्या धाडसामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळत आहे. समुद्राशी मैत्री करत स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा संदेश या दोन्ही तरुण खेळाडूंनी दिला आहे.
जिल्हा
लहानग्या ठाणेकरांचा समुद्रात २१ किमीचा ऐतिहासिक सूर

फोटो: ठाणे वैभव
* स्वराज फडणीस आणि वंशिका अय्यर ठरले पहिले जलतरणपटू
* अटल सेतू ट्रान्स हार्बर लिंक ते पिरवाडी बीच समुद्रमार्ग विक्रमी वेळेत पार
ठाणे : ठाण्याच्या दोन लहानग्या जलतरणपटूंनी खुल्या समुद्रात २१ किमी अंतर पार करत क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. १२ वर्षीय स्वराज फडणीस आणि दहावीतील वंशिका अय्यर यांनी ‘ओपन वॉटर सी स्विमिंग चॅलेंज’ यशस्वीरीत्या पूर्ण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या आव्हानाची सुरुवात पहाटे अटल सेतू ट्रान्स हार्बर लिंक येथून झाली आणि दोघांनीही तब्बल २१ किमी अंतर पार करत पिरवाडी बीच येथे यशस्वीरीत्या पोहून दाखवले. स्वराजने हा पराक्रम अचूक चार तास ५७ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण केला, तर वंशिकाने पाच तास १४ मिनिटांत अंतर गाठले. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळा येथे शिकणारा स्वराज हा या समुद्रमार्गावर पोहून लक्ष्य साध्य करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. या विक्रमाची नोंद महाराष्ट्र राज्य हौशी जलचर संघटनेकडून करण्यात आली असून, या कामगिरीसाठी संघटनेचे निरीक्षक मायकर सर उपस्थित होते. दहावीतील वंशिका अय्यर (न्यू होरायझन इंटरनॅशनल स्कूल) हिनेही अतिशय कठीण अशा अरबी समुद्र मार्गावर पोहून आपली वेगळी छाप सोडली. अवघ्या दहा वर्षांपासून जलतरण सुरू केलेल्या वंशिकाने कठोर सराव, मानसिक ताकद आणि चिकाटीच्या जोरावर हा पराक्रम गाठला आहे. हा समुद्रमार्ग पोहून लक्ष्य साध्य करणारी ती पहिली जलतरणपटू ठरली आहे.
दोघांनीही ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव, बाळकूम येथे नियमित सराव केला, तर आठवड्याच्या शेवटी उरण परिसरात समुद्रात प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. स्वराजला प्रशिक्षण आरती प्रधान आणि नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. तसेच स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉ. काश्मिरा कोर्डे यांनीही साथ दिली. वंशिकाने यापूर्वी २०२४ मध्ये श्रीलंकेतील तलाईमन्नार ते भारतातील धनुष्कोडी दरम्यानच्या २३ किमी ‘पाल्क स्ट्रेट’ रिले स्विममध्ये सहभाग घेत इतिहास घडवला होता.
ओपन वॉटर सी स्विमिंग चॅलेंज’ या मोहिमेचे आयोजन संतोष पाटील व त्यांच्या टीमने केले होते. या स्पर्धेनंतर उरण येथे पार पडलेल्या पुरस्कार समारंभात माजी सरपंच हितेश कोळी, माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, तसेच आंतरराष्ट्रीय विंड सर्फिंग सुवर्णपदक विजेते राज पाटील आणि जयेश पाटील यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. खुल्या समुद्रातील जलतरण हा भारतात तुलनेने कमी परिचित खेळ असला, तरी स्वराज आणि वंशिका यांनी दाखवलेल्या धाडसामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळत आहे. समुद्राशी मैत्री करत स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा संदेश या दोन्ही तरुण खेळाडूंनी दिला आहे.
दोघांनीही ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव, बाळकूम येथे नियमित सराव केला, तर आठवड्याच्या शेवटी उरण परिसरात समुद्रात प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. स्वराजला प्रशिक्षण आरती प्रधान आणि नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. तसेच स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉ. काश्मिरा कोर्डे यांनीही साथ दिली. वंशिकाने यापूर्वी २०२४ मध्ये श्रीलंकेतील तलाईमन्नार ते भारतातील धनुष्कोडी दरम्यानच्या २३ किमी ‘पाल्क स्ट्रेट’ रिले स्विममध्ये सहभाग घेत इतिहास घडवला होता.
ओपन वॉटर सी स्विमिंग चॅलेंज’ या मोहिमेचे आयोजन संतोष पाटील व त्यांच्या टीमने केले होते. या स्पर्धेनंतर उरण येथे पार पडलेल्या पुरस्कार समारंभात माजी सरपंच हितेश कोळी, माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, तसेच आंतरराष्ट्रीय विंड सर्फिंग सुवर्णपदक विजेते राज पाटील आणि जयेश पाटील यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. खुल्या समुद्रातील जलतरण हा भारतात तुलनेने कमी परिचित खेळ असला, तरी स्वराज आणि वंशिका यांनी दाखवलेल्या धाडसामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळत आहे. समुद्राशी मैत्री करत स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा संदेश या दोन्ही तरुण खेळाडूंनी दिला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600