जिल्हा

उल्हासनगरमध्ये तीन किलोहून अधिक गांजासह आरोपी अटकेत

उल्हासनगरमध्ये तीन किलोहून अधिक गांजासह आरोपी अटकेत
उल्हासनगरमध्ये तीन किलोहून अधिक गांजासह आरोपी अटकेत फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने अवैध धंद्यांविरोधात कारवाई करत उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकखालील आदर्श नगर परिसरातून एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे. गुरुवारी दुपारी गस्तीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक दराडे व त्यांच्या पथकाला पाहताच एक व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी त्याच्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रहार गोडसे हेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी रविंद्र शेंगदाणे (३५) याच्याकडून ६६,२०० रुपये किमतीचा एकूण तीन किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600