जिल्हा

विधानपरिषद निवडणूकीमुळे सिडकोची भरती रखडली

विधानपरिषद निवडणूकीमुळे सिडकोची भरती रखडली
विधानपरिषद निवडणूकीमुळे सिडकोची भरती रखडली फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सिडको महामंडळाच्या भरती प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागला असून विविध संवर्गांचे अंतिम निकाल आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जाहीर होणार असल्याचे सिडको प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सिडको महामंडळाने २०२३ ते २०२५ या कालावधीत विविध १० संवर्गातील १९२ पदांसाठी अभियांत्रिकी, नियोजन, सर्वसाधारण गट, लेखा, वास्तुशास्त्र अशा विविध विभागांकरीता भरती प्रक्रिया सुरू केली. या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षेसाठी सिडको मंडळाने आय.बी.पी.एस या बाह्य संस्थेला काम सोपवले होते. या संस्थेने त्यांच्याकडे उपलब्ध तारखेनूसार मागील वर्षी जून व जुलै महिन्यात पूर्ण केल्या. सिडकोच्या म्हणण्यानुसार, १० पैकी चार संवर्गांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित उमेदवार सेवेत रुजू झाले आहेत. आणखी दोन संवर्गांचे निकाल पुढील काही दिवसांत जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. उर्वरित चार संवर्गांची नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु सिडकोच्या कार्यवाहीनूसार पात्र उमेदवारांची यादी जाहीर होण्याच्या मुहूर्तावरच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता संपल्यावरच यातील पात्र नियुक्तांची नावे जाहीर होणार असल्याने अजून महिनाभर तरी या उमेदवारांच्या नशीबी प्रतिक्षा आहे. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक १८ जून आणि २२ जून रोजी निकाल लागल्यानंतरच आचारसंहिता संपेल. पात्र उमेदवारांची नावे त्यानंतरच सिडको जाहीर करेल असे नियोजन सिडकोने केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600