जिल्हा

कळवा-मुंब्र्यातील सहा हजार वीजग्राहकांवर होणार कारवाई

मिटरशिवाय वीज वापरली; नोटीसाही धुडकावल्या ठाणे : कळवा-मुंब्रा-शीळ भागातील थकबाकीदाराना टोरंट पॉवरने आता तिसरी अंतिम नोटीस दिली आहे. यानंतर मात्र अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कंपनीने दिला आहे. टोरंट पॉवर कंपनीने स्मरणपत्र देऊनही वीज बिलाची थकीत रक्कम न देणाऱ्या सुमारे सहा हजार वीजधारकांना तिसरी आणि अंतिम नोटीस जारी केली आहे. हे लोक मीटरशिवाय वीज वापरत आहेत. टोरंट पॉवरने या लोकाना गेल्या महिन्यात दुसरी नोटीस पाठवताना सार्वजनिक आवाहन केले होते. ज्यांचे मीटर पीडी (कायमचे डिस्कनेक्ट केलेले) आहेत आणि पीडीच्या थकबाकीबाबत काही शंका किंवा वाद आहेत, असे लोक अरिहंत बिल्डिंग, कल्याण रोड येथील टोरेंट पॉवरच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता असेही आवाहन करण्यात आले आहे. त्याठिकाणी महावितरणचे अधिकारी सोमवार आणि मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत विशेषत: पीडी थकबाकीबाबत भेटण्यासाठी उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे. आजपर्यंत १०० जणांनी देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला नाही. टोरेंट पॉवरने पुन्हा लोकांना आवाहन केले आहे की, पीडीच्या थकबाकीबाबत काही वाद असल्यास लोकांनी त्यांच्या कागदपत्रांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करावे. जर लोकांनी तीन नोटिसा देऊनही प्रतिसाद दिला नाही तर कंपनीला विद्युत कायदा २००३ अंतर्गत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी केली जाईल असा इशाराच दिला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600