जिल्हा

नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला ठेंगा

१० दिवसात फक्त १० जणांनी घेतली कोरोना लस ठाणे : कोरोनाची नाकावाटे दिली जाणारी लस ठाणे महापालिकेला उपलब्ध झाली आहे. त्यानुसार २८ एप्रिल ते ८ मे पर्यंत या १० दिवसांच्या कालावधीत अवघ्या १० जणांनीच लस घेतली असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील दोन वर्षे कोरोनाचा कहर होता. त्यावर मात्रा म्हणून कोरोनाची लस उपलब्ध झाली होती. यापूर्वी दंडावर लस दिली जात होती. परंतु आता नाकावाटे दिली जाणारी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरीकांना ही लस दिली जाणार आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेकडे २५० लस उपलब्ध झालेल्या आहेत. महापालिकेने आपल्या आरोग्य केंद्रात २८ एप्रिलपासून ही लस देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. परंतु मागील १० दिवसात अवघ्या १० जणांनीच याचा लाभ घेतल्याचे दिसून आले आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आणि जास्त जीवघेणा नसल्यामुळे लोक लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाच्या वतीने पालिका क्षेत्रातील एकूण सहा केंद्रांवर नोजल ड्रॉप लस उपलब्ध आहे. तरीही ठाणे महापालिका क्षेत्रातील एक लाख २० हजार ज्येष्ठांनी बुस्टर डोस घेतलेला नाही. अशा ज्येष्ठांसाठीच नोजल ड्रॉप उपलब्ध करून देण्यात आला आहे. ६० वर्षांवरील नागरिकांनी महापालिकेच्या ७३०६३३०३३० या हेल्पलाइनवर संपर्क साधून बूस्टर डोस बुक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600