जिल्हा

दिल्लीतील स्फोटानंतर मुंब्र्यात मोठी छापेमारी

ठाणे: नवी दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर देशभर छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रातही अशा कारवायांना वेग आला आहे. महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातील कौसा येथे छापेमारी केल्याची घटना घडली आहे. संबंधित आरोपी मुंबईतील एका मदरशामध्ये शिक्षक असून त्याचे आयसिसशी खास कनेक्शन असल्यावरून ही कारवाई झाली आहे. यावेळी कारवाईत चार घरांची झाडाझडती घेण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी पुणे येथे महाराष्ट्र एटीएसने धाड टाकून काही लोकांना अटक केली होती. यावेळी आरोपींच्या चौकशी दरम्यान मुंब्र्यातील कौसामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाचा संबंध असल्याचा माहिती समोर आली होती. या शिक्षकाचा जमात ए इस्लाम या संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या शिक्षकाचे नाव समजू शकलेले नाही. पण या कारवाईत आतापर्यंत घरातले मोबाईल, संगणक आणि इतर सामुग्री हस्तगत करण्यात आली होती. मुंबईतील कुर्ल्यामधील त्याच्या दुसऱ्या घरी महाराष्ट्र एटीएसने छापा टाकून पुढील तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600