जिल्हा

नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न

अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचा टोला अंबरनाथ: राज्य पातळीवर महायुती म्हणून निवडणुका लढवण्याबाबत भाष्य करतात मात्र अंबरनाथमध्ये भाजपाचा नगराध्यक्षपदाचा जाहीर करण्याचा प्रयत्न केविलवाणा असल्याचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर सेना-भाजपमधील संघर्ष काही कमी होतांना दिसत नाही. महायुती असतांना देखील भाजपने अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदाच्या चार उमेदवारांची नावे पक्षाकडे पाठवली आहेत. याबाबत शहरप्रमुख वाळेकर यांनी भूमिका स्पष्ट करून नाराजी दर्शवली. महायुतीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. मात्र भाजपने नगराध्यक्ष पदासाठी स्थानिक पातळीवर उमेदवार रिंगणात उतरवला असून त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. नुकत्याच भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अंबरनाथचा दौरा केला. यावेळी शहरातील विकासकामांवर देखील त्यांनी भाष्य केले. मात्र चित्रा वाघ यांना अंबरनाथचा विकास काय माहित, अशा शब्दात शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी भाजपला टोला लगावला. कोणत्याही निवडणुका लढवण्याबाबत शिवसैनिक नेहमीच तयार असतो, आपण देखील तयार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नेहमीच महायुती म्हणून लढू असे सांगत असतात, मात्र अंबरनाथमध्ये उमेदवार जाहीर करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप करत आहे. युतीत बोलणी झाल्यावर उमेदवार घोषित होतात, यंदा ४० ते ४५ नगरसेवक शिवसेनेचे निवडून येतील असा विश्वास शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी व्यक्त केला. तसेच युतीबाबत जो आदेश येईल त्यानुसार काम करू, राष्ट्रवादीसोबत युती होत आहे, भाजपाला युती करायची असेल तर त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करण्याचे वक्तव्य वाळेकर यांनी केले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600