जिल्हा

महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला; पोलिस कर्मचारी जखमी

मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल ठाणे : वीजचोरी शोध मोहिमेवर असलेल्या महावितरणच्या भरारी पथकावर डोंबिवली नजिकच्या खोणीगाव येथे बुधवार २४ मे रोजी दुपारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पथकातील एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. इतर सात जणांना हल्लेखोरांनी धक्काबुक्की, शिवीगाळ करत धमकावले आहे. दोघा हल्लेखोरांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींच्या अटकेसाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. रंजीत ठोंबरे, मारुती ठोंबरे, हरेष ठोंबरे, बायमाबाई ठोंबरे, अंकिता राजीन ठोंबरे, सचिन ठाकरे, भगवान ठोंबरे, सचिन ठाकरे याचा भाऊ (नाव माहित नाही) आणि इतर सहा ते सात अनोखळी व्यक्ती (सर्व रा. खोणीगाव) आहेत. महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाची तीन पथके कल्याण पश्चिम उपविभाग एक अंतर्गत खोणीगाव परिसरात वीजचोरीच्या विशेष शोध मोहिमेवर होती. उपकार्यकारी अभियंता राजेश म्हसणे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने खोणीगावातील श्रीधर ठोंबरे, रंजित ठोंबरे आणि बायमाबाई ठोंबरे यांच्या दुमजली बंगल्यातील वीज पुरवठ्याची तपासणी केली. यात दोन मीटर बायपास करून थेट वीजचोरी सुरू असल्याचे तर एका मीटरमध्ये फेरफार करून मीटरचा वेग कमी केल्याचे आढळले. त्यानुसार संबधित वीज मीटर जप्त करून पथक पुढील कारवाईसाठी निघाले असता रंजित ठोंबरे याने जमाव जमा केला आणि पथकाच्या वाहनावर दगडफेक केली. बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी एस. एम. वाघमारे यांना काठीने मारहाण केली. पथकातील इतर दोन पोलिस कर्मचारी यांच्यासह, एक वाहन चालक, महावितरणचे चार अधिकारी-कर्मचारी यांना धक्काबुक्की, शिवीगाळ व गावात परत आल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. दगडफेक करून वाहनाचे नुकसान केले व जप्त केलेले मीटरही हिसकावून नेले. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600