जिल्हा

अविनाश जाधव यांना मुंब्र्यात पुन्हा प्रवेशबंदी

ठाणे: अनधिकृत मशिदीविरोधात ३० एप्रिलच्या आत कारवाई करा अन्यथा शेजारी हनुमान मंदिर उभारण्याचा इशारा दिल्यानंतर पुन्हा एकदा मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ९ मेपर्यंत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी मुंब्र्यातील मनसे पदाधिकारी राजू गायकवाड यांच्या घरी भेट देऊन अविनाश जाधव यांनी, मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशिदींचा मुद्दा अद्याप सोडलेला नसल्याचे नमीद केले. तसेच, येत्या ३० एप्रिलपर्यंत प्रशासनाने कारवाई करावी. अन्यथा, मनसे स्टाईल पुढचे पाऊल उचलणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मनसेच्या या पावित्र्याने पोलीस आणि वनविभाग सतर्क झाला आहे. तुर्तास कारवाईचे आश्वासन देण्यात आल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. गुढी पाडव्याच्या मुंबईतील मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत मशिदींचा मुद्दा उचलला होता. त्यानंतर, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे आणि मजारचा पर्दाफाश करून कारवाईची मागणी केली होती. कारवाई केली नाही तर त्या मशिदींशेजारी मंदिर उभारण्याचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. मात्र, कारवाई करण्याआधीच रमजान-ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत ठाणे पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन मुंब्य्रात प्रवेश बंदी केली होती. २४ एप्रिल रोजी ही बंदी उठवण्यात आली. त्यानंतर मंगळवारी अविनाश जाधव हे स्वतः मुंब्रा येथे दाखल झाले. त्यांनी मुंब्रातील मनसेचे विभाग अध्यक्ष राजु गायकवाड यांची भेट घेतली. अनधिकृत बांधकामांचा विषय ज्वलंत असून मी हा विषय कधीच सोडलेला नाही आणि याबाबत मी सातत्याने माझ्या भूमिकेची आठवण करून देत राहणार असल्याचे यावेळी अविनाश जाधव यांनी सांगितले. ठाणे शहराचे सौंदर्य टिकून राहाव्ह हाच माझा उद्देश असून या संदर्भात वनअधिकारी यांची भेट घेतली आहे. त्यांनी देखील ३० एप्रिलपर्यंत वेळ मागितली आहे. ३० एप्रिलपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन वनविभागाने दिलेले आहे. कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईल पाऊल उचलणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. श्री. जाधव यांनी मुंब्रा परिससरात येऊन दर्गा आणि मशिदीचा मुद्दा उपस्थित केला, त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता नसल्याने कळवा विभागाचे सहाय्य आयुक्त विलास शिंदे यांनी ९ मेपर्यंत बंदी घातली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600