जिल्हा
पाणीपट्टी आणि अग्निशमन करवाढीचा निर्णय रद्द
मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांचा निर्णय
ठाणे: मीरा-भाईंदर महानगरपालिका सन 2023-24 अर्थसंकल्पीय प्रशासकीय ठरावानुसार पाणीपट्टी कर व अग्निशमन कर व नव्याने प्रस्तावित पाणी लाभ कर यामधील दरवाढ रद्द करण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी घेतला आहे. यामुळे मीरा-भाईंदरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाणीपट्टी करात वाढ करून प्रती 1000 लिटर 16 रुपये कर आकारणी ही घरगुती पाणी वापरासाठी तर वाणिज्य वापरासाठी प्रती 1000 लिटर 65 रुपये इतकी वाढ करण्यात आली होती. पाणी लाभ कर हा नव्याने प्रस्तावित करून 10 टक्के घरगुती वापर आणि 15 टक्के वाणिज्य वापरासाठी ठराव करण्यात आला होता. अग्निशमन करात अर्ध्या टक्क्याने वाढ करून 1.5 टक्का करवाढ प्रस्तावित करण्यात आली. शहरातील नागरिक/लोकप्रतिनिधी यांनी पत्राद्वारे सदर करवाढ ही रद्द करण्याची मागणी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्याकडे केली होती.
करवाढ कमी करण्याच्या मागणीचा आयुक्त ढोले यांनी फेरविचार करत ही प्रस्तावित करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. करवाढ रद्द केल्याने शहरातील नागरिकांनी आयुक्त ढोले यांचे आभार मानले आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600