जिल्हा

बिहारमध्ये 'एनडीए'चे द्विशतक!

बिहारमध्ये 'एनडीए'चे द्विशतक!
बिहारमध्ये 'एनडीए'चे द्विशतक! फोटो: ठाणे वैभव
काँग्रेस-आरजेडी भुईसपाट ठाणे: बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप, जेडीयु आणि मित्रपक्षांच्या आघाडीला निर्विवाद बहुमत मिळाले असून काँग्रेस-आरजेडी पक्ष भुईसपाट झाले आहेत. २४३ पैकी तब्बल २०३ जागा भाजप, जेडीयु आणि मित्रपक्षांच्या आघाडीला मिळाल्या असून काँग्रेस-आरजेडी आणि मित्रपक्षांना फक्त ३४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. बिहारमधील या ऐतिहासिक विजयाचा उत्सव भाजप देशभर साजरा करत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शुक्रवारी पार पडली. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचा चेहरा या निवडणुकीत अधिक प्रभावी ठरला. २४३पैकी एनडीएला २०३ जागांवर विजय मिळाला. यात भाजप ९० जागांवर विजयी होत मोठा भाऊ ठरला तर जेडीयुने ८५ जागा मिळवत दुसरा क्रमांक पटकावला. इतर मित्र पक्षांनी २८ जागा जिंकल्या. या तुलनेत काँग्रेस-आरजेडी यांचे गठबंधन सपशेल अपयशी ठरले. या महागठबंधनला अवघ्या ३४ जागा मिळाल्या. यात आरजेडी २४, काँग्रेस सहा आणि इतर चार जागांचा समावेश आहे. एकूणच या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे दिसून आले आहे. महागठबंधनच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. महागठबंधनच्या नेत्यांनी एनडीएविरोधात निगेटिव्ह कॅम्पेन केले. त्याचा फायदा उचलत भाजपने जनतेत प्रचार केला. काँग्रेस आणि आरजेडी यांच्यात जागावाटपाचा घोळ दीर्घकाळ सुरू होता, शिवाय त्यांना वेळेवर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करता आला नाही.काँग्रेसच्या नेत्यांनी देखील प्रचारात आखडता हात घेतल्याने तेजस्वी यादव एकटे पडले. विशेष म्हणजे लालूप्रसाद यादव यांच्या घरातच संघर्ष असल्याने अंतर्गत आरोप प्रत्यारोपांमुळे मतदारांमध्ये प्रतिमा डागाळली. अशा अनेक कारणांनी महागठबंधनला पराभव पत्करावा लागल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे एनडीएला पुन्हा लाडकी बहीण योजनेने विजयाच्या दिशेने नेले. महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. १२५ युनिट वीज मोफत मिळाल्याने त्याचा फायदा लाखो कुटुंबांना मिळाला. मित्रपक्षांना सोबत ठेवण्यातही भाजपला यश मिळाले. चिराग पासवान आणि जितन मांझी यांचे सोशल इंजिनिअरिंग देखील फायद्याचे ठरले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचा आश्वासक चेहरा पुढे करण्यात आल्याने मतदारांनी एनडीएला स्वीकारले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600