जिल्हा

बिहारमधील विजयाबद्दल ठाण्यात भाजपकडून आनंदोत्सव

बिहारमधील विजयाबद्दल ठाण्यात भाजपकडून आनंदोत्सव
बिहारमधील विजयाबद्दल ठाण्यात भाजपकडून आनंदोत्सव फोटो: ठाणे वैभव
ठाणे : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपासह एनडीए चा बहुमताने विजय झाल्याबद्दल, ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी रेल्वे स्टेशनबाहेर आयोजित केलेल्या विजयी जल्लोषाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. भाजपाच्या विजयाची परंपरा सुरू देदिप्यमान रचून इतिहास रचला, याबद्दल आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, संजय वाघुले यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी माजी उपमहापौर सुभाष काळे, शरद पुरोहित, सुभाष काळे, जयेंद्र कोळी, बाळा केंद्रे, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले, मंडल अध्यक्ष रोहित गोसावी, निलेश पाटील, सचिन सावंत, योगेश भुजबळ यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अद्वितीय नेतृत्व, भाजपाची संघटनात्मक रणनीती आणि पक्षाने देशभर राबविलेल्या लोककल्याणकारी धोरणांमुळे हा विजय झाला. बिहारमधील जनतेने विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास व्यक्त केला, अशी प्रतिक्रिया संजय वाघुले यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600