जिल्हा
बिपरजॉय बिघडले
जुहू चौपाटीजवळ समुद्रात सहाजण बुडाले
मुंबई: अरबी समुद्रात घोंघावत असलेले बिपरजॉय चक्रीवादळाने तीव्र रूप घेतलं आहे. समुद्रकिनारी जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. अशात जुहू चौपाटीजवळील समुद्रात सहाजण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जुहू चौपाटीजवळ समुद्रात सहाजण बुडाले आहेत. यात दोन जणांना स्थानिकांनी वाचवले आहे. तर, चार जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन आणि नौदलाकडून चौघांचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600