जिल्हा

झाडाला लागण्याआधीच 'नूरजहाँ' आंबा होतो आरक्षित

'आंब्यांची राणी' तब्बल पाच किलोची! मुंबई: आंब्याचा राजा म्हणून कोकणच्या हापूस आंब्याची ओळख आहे. पण अफगाणी प्रजातीचा आंबा तब्बल पाच किलोचा असून मध्य प्रदेशात याचे उत्पादन घेतले जाते. या आंब्याला आंब्याची राणी म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे हा आंबा झाडाला लागण्याआधीच ग्राहकांकडून आरक्षित केला जातो. आंबा हा फळांचा राजा म्हटला जातो. हापूस आंबा सर्वात प्रसिद्ध आहे. भारतातील विविध प्रदेशातील आंब्यांचीही स्वतःची खासियत आहे. दसरी, चौसा आणि लंगडा ही आंब्याची नावे परिचित आहेत. पण पाच किलो वजनाच्या आंब्याचे नाव आहे 'नूरजहाँ' आंबा. 'नूरजहाँ' आंबा त्याच्या विशेष आकारासाठी ओळखला जातो. या प्रजातीच्या आंब्याचे वजन साधारणपणे तीन ते पाच किलोच्या दरम्यान असते. भारतासह जगभरात या आंब्याची ख्याती आहे. नूरजहाँ आंबा प्रजातीचे मूळ अफगाण असल्याचे मानले जाते. या अफगाणी प्रजातीचा आंब्याचे उत्पादन भारतामध्ये विशेषत: मध्य प्रदेशात घेतले जाते. 'नूरजहाँ' जातीच्या आंब्याचे जास्तीत जास्त वजन पाच किलोग्रॅमपर्यंत असते. या विशेष जातीच्या आंब्याचे उत्पादन घेणाऱ्यांना झाडाची विशेष काळजी घ्यावी लागते. हवामान अनुकूल राहिल्यास या आंब्याचे उत्पादन चांगले येते आणि त्याचे वजनही अधिक असते. सध्या भारतात मध्य प्रदेशातील इंदौर येथील कठ्ठीवाडा परिसरात या आंब्याचे उत्पादन घेतले जाते. या आंब्यांची मोजकी झाडे असल्यामुळे याची मागणी मोठी असून आंब्यांची विक्री जास्त किमतीला होते. नूरजहाँ आंब्याची मागणी अधिक आहे. या आंब्याची अगदी काही मोजकी झाडे असल्यामुळे झाडावर आंबे लागण्याआधी यांची ऑर्डर दिली जाते. आंब्याच्या मोसमाच्या आधीच नूरजहाँ आंब्याची ऑर्डर द्यावी लागते. हवामान अनुकूल असेल तर, हा आंबा जास्त वजनाचा होतो. हा आंबा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होतो. मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील काठीवाडा भागात नूरजहाँ आंब्याची लागवड केली जाते. गुजरातला लागून असलेला हा परिसर इंदूरपासून सुमारे 250 किलोमीटर अंतरावर आहे. एका उत्पादकाने दिलेल्या माहितीनुसार 15 जूनपर्यंत आंबा पिकण्यास तयार होईल. यावेळी एका आंब्याचे वजन चार किलोपेक्षा जास्त असू शकते. नूरजहाँ आंब्यांची किंमत त्याच्या वजनाप्रमाणेच जास्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नूरजहाँ आंब्याची चव चाखण्यासाठी सुमारे 2000 रुपये खर्च करावे लागतील.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600