जिल्हा
बर्ड फ्लूच्या भीतीमुळे माशांचे दर वधारले
बर्ड फ्लूच्या भीतीमुळे माशांचे दर वधारले
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: शहराच्या वेशीवर असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील चिरनेर, तर ठाणे शहरातील कोपरी भागात बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला असून राज्यातही फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. परिणामी खवय्यांचा ओढा माशांकडे मोठ्या प्रमाणात वळला असून माशांचे भाव चांगलेच वधारले आहेत.
बर्ड फ्लूच्या भीतीमुळे चिकन, मटण आणि अंड्यांवर ताव मारणाऱ्या मंडळींची सध्या थोडी पंचायत झाली आहे. कारण महाराष्ट्रात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. डॉक्टर भले चिकन, अंडी चांगली उकडून खा सांगत असतील मात्र चिकन आणि अंडी खाल्याने बर्ड फ्लू तर होणार नाही ना अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. म्हणूनच या मंडळींनी आपला मोर्चा माशांकडे वळवला आहे. तर माशांचे भावही चांगलेच वाढले आहेत. चिकनचे भाव २२० किलोवरून १८० वर आले असून, मटणाचे भाव माञ ७०० ते ८०० रूपये आहे. एक डझन अंड्याचे भावही ७२ वरून ६० रुपये झाले आहेत. यामुळे आता मासे जरी खायचे म्हटले तरी थोडे अधिकचे पैसे मांसाहार करणाऱ्यांना मोजावे लागत आहेत.
थंडीमुळे आवक कमी असल्याने आधीच माशांच्या किमती वाढल्या आहेत. यात आता बर्ड फ्लू आल्याने दरांमध्ये अधिकच वाढ झाली आहे. यामुळे इथून पुढचे काही दिवस तरी मासे खवय्यांच्या खिशाला चाट बसणार आहे.
माशांचे दर
पापलेट मोठा: १०००-१५०० किलो,
सुरमई: ८०० ते १२०० किलो
हलवा: ६०० ते किलो १००० किलो
छोटी पापलेट: ९०० ते १२०० किलो
कोळंबी: ५०० ते ७५० किलो
रावस: ६०० ते १००० किलो
बांगडा: ३५० डझन
बोंबील: ३५० ते ४०० किलो
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600