जिल्हा

शक्तीस्थळावर शिवसैनिक नतमस्तक

शक्तीस्थळावर शिवसैनिक नतमस्तक
शक्तीस्थळावर शिवसैनिक नतमस्तक फोटो: ठाणे वैभव
ठाणे: स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकारी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसह स्व.आनंद दिघे यांचे कार्यालय असलेल्या टेम्भी नाका येथील आनंदआश्रमात जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत स्मृतींना वंदन केले. आनंदआश्रमासमोरील चौकात असलेल्या त्यांच्या अर्ध पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून त्यापुढेही नतमस्तक झाले. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांची शिकवण अंगिकारून शिवसेनेची वाटचाल पुढे सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुती सरकारला निर्विवाद कौल देऊन जनतेने पुन्हा सत्तास्थानी बसवले आहे. लाडकी बहीण, भाऊ, शेतकरी, कष्टकरी, कामगार, तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक यांच्या पाठींब्याने हे सरकार निवडून आले. त्यामुळे आता दिघे साहेबांच्या शिकवणीनुसार लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहून लोकांसाठी काम करून त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान आनंद आणण्यासाठी काम करण्याचा संकल्प केला असल्याचे यावेळी श्री.शिंदे यांनी बोलताना सांगितले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार मुरजी पटेल, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक पवन कदम, राम रेपाळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600