जिल्हा

आचारसंहितेमुळे अंबरनाथमधील विकासकामांना ब्रेक

अंबरनाथ: विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्याने अंबरनाथमधील विकास कामांवर परिणाम होणार असून कामे ठप्प होणार आहेत. नगरपालिकेकडून शहरातील विविध विकासकामांसाठी मंजूर केलेली आणि निविदा जाहीर करून सुद्धा शिवसेना, भाजप युतीच्या संघर्ष सुरू असल्याने 56 कोटी रुपयांची कामे अडकून पडली होती. शिवसेना आणि भाजपा पक्षातील युतीनंतर शहरातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला असतांनाच, विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्वच विकासकामे लांबणीवर पडली आहेत. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पाच वर्षांची प्रशासकीय राजवटी संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींच्या हाती डिसेंबर २०२५ मध्ये शहर विकासाचा कारभार आला. त्यामुळे शहरातील विकासकामे वेगाने मार्गी लागतील अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र शिवसेना, भाजप यांच्यातील सत्ता संघर्षात गेले जवळपास सहा महिने सभागृहातील कामकाज ठप्प पडले होते. तसेच एकमेकांवर कुरघोड्यांच्या राजकारणात नागरी समस्याही रखडल्या होत्या. त्यात दोन्ही पक्षांमध्ये तडजोड करत निविदा जाहीर करण्यात प्रशासनाला यश आले होते. त्यानुसार याच महिन्यात शहरातील रस्ते, गटार, पायवाटा, सभागृहांच्या कामासाठी 36 कोटी 22 लाखांची तर सीसीटीव्हीसाटी खोदलेल्या रस्त्यांसाठी 10 कोटींची तसेच इतर काही विकासकामांसाठी आणखी जवळपास 10 कोटी रूपयांच्या अशा जवळपास 56 कोटी रूपयांच्या एकूण निविदा जाहिर कऱण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांत सुरू असलेल्या सत्ता संघर्षात आधीच या निविदा प्रक्रीया रखडल्या होत्या. गेल्या आठवड्यात शिवसेना-भाजपची युती झाल्याने विकासकामांचाही मार्ग मोकळा झाला होता. सोमवारी विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणुक जाहिर झाल्याने पुढील दीड महिना निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू कऱण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे या निविदा उघडण्यावर निर्बंध आल्याने या कालावधीत विकासकामांना ब्रेक लागणार असल्याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. बदलापूरची सभा रद्द दरम्यान बदलापूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा उद्या बुधवारी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र विधान परिषद निवडणूक आचारसंहितेच्या कारणावरून उद्याची सभा देखील रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600