जिल्हा

विधान परिषद निवडणुकीत भाजपची स्वबळाची तयारी?

विधान परिषद निवडणुकीत भाजपची स्वबळाची तयारी?
विधान परिषद निवडणुकीत भाजपची स्वबळाची तयारी? फोटो: ठाणे वैभव
* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले * ठाणे-पालघरमध्ये भाजपकडे नगरसेवकांचे सर्वाधिक संख्याबळ ठाणे: ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून ठाणे-पालघर जिल्ह्यात सर्वाधिक नगरसेवक असलेला भाजप स्वबळावर निवडणुक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र महापालिकांमध्ये युती असताना भाजप युतीधर्म पाळणार की शिवसेना शिंदे गटाला शह देणार, याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांमध्ये ठाणेसह राज्यातील १६ मतदारसंघांचा समावेश आहे. तीन वर्षे ११ महिन्यांनंतर ही निवडणूक होत आहे. निवडणुकांची घोषणा होताच ठाणे-पालघर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या मतदारसंघात अंदाजे १०३० मतदार असून महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील नगरसेवक हेच या निवडणुकीतील निर्णायक मतदार असणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाच्या जोरावर सर्व प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मतदारसंघात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरारसह सात महापालिका, सात नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवर निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपकडे सर्वाधिक ४४४ मतांचे संख्याबळ आहे. दुसरीकडे शिवसेनेकडे ३२६ मते असून नुकतेच त्यांच्या पक्षात प्रवेश केलेले निलेश सांबरे यांच्याकडे २० मते आहेत. हा आकडा ३४६ इतका होतो. ठाणे जिल्ह्यात भाजप आणि यांच्या शिवसेना शिंदे गटातील स्थानिक नेत्यांमध्ये सातत्याने शह-काटशहाचे राजकारण सुरू असून स्थानिक नेत्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते दिसून येत आहे. अशातच ही निवडणुक जाहीर झाल्याने भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट लढत रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बहुजन विकास आघाडीकडे ७१ मते असून हितेंद्र ठाकूर यांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेसकडे ४७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ३८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २९ तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे १८ मते आहेत. याशिवाय मनसे, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट प्रत्येकी ६, एमआयएम ५, कोनार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३, वंचित बहुजन आघाडी २, साई पक्ष १, अपक्ष ९ मते असून ही मतेही निर्णायक ठरू शकतात.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600