जिल्हा
पहिल्याच दिवशी १०६९ नामनिर्देशनपत्रांचे वाटप
पहिल्याच दिवशी १०६९ नामनिर्देशनपत्रांचे वाटप
फोटो: ठाणे वैभव
ठामपाच्या नऊ प्रभागांत इच्छुकांचा उत्साह
ठाणे: ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आजपासून नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यास सुरूवात झाली. ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीतून एकूण 1069 नामनिर्देशन पत्राचे वाटप उमेदवारांना करण्यात आले.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 8 साठी एकूण 157 नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यात आले. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत 4, 5, 7 या प्रभागांसाठी एकूण 103 अर्जाचे वाटप करण्यात आले. लोकमान्यनगर-सावरकर नगर प्रभाग समितीअंतर्गत 6, 13, 14, 15 या प्रभागांसाठी 177 अर्जाचे वाटप करण्यात आले. वागळे प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक 16, 17, 18 साठी एकूण 102 नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यात आले.
नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत 19, 20, 21, 22 साठी एकूण 113 अर्जांचे वाटप करण्यात आले. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत 10, 11, 12 या प्रभागांसाठी एकूण 101 नामनिर्देशन अर्जांचे वाटप करण्यात आले. कळवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्र 9, 23, 24, 25 या प्रभागांसाठी 121 नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यात आले.मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत तर 26, 31 या प्रभागासाठी 35, तर 30, 32 या प्रभागांसाठी एकूण 36 नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यात आले. दिवा प्रभाग समिती अंतर्गत 27, 28 या प्रभागांसाठी एकूण 78 तर 29, 33 या प्रभागांसाठी 46 अर्जांचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रभाग समितीनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600