जिल्हा

आव्हाड समर्थक माजी नगरसेवक जितेंद्र पाटील शिवसेनेत

ठाणे : राष्ट्रवादी पुरस्कृत आणि जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती माजी नगरसेवक जितेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मिशन कळवा अंतर्गत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात हा पहिला सुरुंग शिवसेनेने लावला आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ‘कळवा मिशन’ची घोषणा केली होती. या घोषणेनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला होता. या भागातील प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमांवरूनही शिंदे आणि आव्हाड यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली होती. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा भागाचे प्रतिनिधित्व करतात. या भागातून महापालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात. हा संपूर्ण परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात हा परिसर येतो. त्यामुळेच राज्यातील सत्ताबदलानंतर डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी कळवा-मुंब्रा भागावर लक्ष केंद्रीत करत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू केल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी विटावा भागातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पारसिक नगर येथील ९० फूट रस्ता येथे मराठी बाणा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान, जितेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर या भागातील उद्योजक संतोष तोडकर यांनीही कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. पाटील यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला त्यांच्याच बालेकिल्ल्यात हा पहिला धक्का मनाला जात आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600