जिल्हा

अतिक्रमणांमुळे भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका

दर्ग्याशेजारी मंदिर उभारण्याचा मनविसेचा इशारा ठाणे: पर्यटकांचा राबता असलेल्या येऊरमधील मामा-भांजे दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या कान्हेरी हिल येथील भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही अतिक्रमणे वाढत आहेत. अनधिकृत धर्मस्थळापेक्षा देशाची सुरक्षा महत्वाची असल्याने प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ हटवावे, अन्यथा, दर्ग्याशेजारीच शंकराचे मंदिर उभारण्याचा इशारा मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर वनक्षेत्रातील मामा-भांजे दर्ग्याच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले आहे. याठिकाणी दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी स्थानिकांनी मनविसेकडे केल्या आहेत. एरव्ही, एअर फोर्स स्टेशनच्या १०० मीटर परिसरात झाडे लावण्यास देखील मनाई असताना बिनदिक्कतपणे अशाप्रकारे अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. वायुसेनेच्या या युनिटच्या परिसरात मामा-भांजे दर्ग्यालगत काही अनोळखी लोक स्थलांतरित झाल्याने राष्ट्रीय सुरक्षिततेला देखील धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत, भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने येथील बेकायदा बांधकामे त्वरीत हटविण्याची मागणी प्रशासनाकडे केली. मात्र, ढिम्म प्रशासनाने रमजान सण असल्याचे निमित्त सांगुन कारवाईत चालढकल सुरु केली. त्यामुळे, मनविसेने थेट वनविभागाकडे निवेदन देऊन या अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम त्वरीत हटवण्याची मागणी केली असुन अन्यथा या दर्ग्याशेजारीच शंकर मंदिर उभारण्यात येईल. असा गर्भित इशारा मनविसेने दिला आहे. येऊरच्या दक्षिणेकडे उंच डोंगर माथ्यावर मामा-भांजे दर्गा आहे. या डोंगरावर समाधी घेतलेल्या हजरत सय्यद बहाउद्दीन आणि हजरत सय्यद बद्रुद्दीन या सुफी पंथांच्या मामा-भाच्यांचे दर्गे असल्याची वदंता आहे. मात्र ते केव्हा आणि कसे आले याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याठिकाणी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने त्या परिसरात अनधिकृत बांधकामे करण्यात आली असून त्यामुळे एअरफोर्सच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600