जिल्हा
माजी नगरसेवक प्रकाश गुप्ते यांचे निधन
माजी नगरसेवक प्रकाश गुप्ते यांचे निधन
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाण्यात नाट्यगृह व्हावे अशी चिट्ठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाहीर सभेत पाठवणारे शिवसैनिक प्रकाश गुप्ते यांचे आज निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
श्री.गुप्ते हे नगरपालिका असताना शिवसेनेचे नगरसेवक होते. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर ठाण्यात झालेल्या विजयी मेळाव्यात त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ठाण्यात नाट्यगृह असावे अशी चिट्ठी पाठवली होती आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे राम गणेश गडकरी रंगायतनची संकल्पना घोषित केली होती.
गुप्ते यांच्या पश्चात पत्नी श्रीमती प्रज्ञा, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी त्यांचा देह रुग्णालयास दान केला. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सहकारी नगरसेवक भास्कर पाटील, माजी नगरसेवक संजय आणि महेश्वरी तरे, विलास जोशी आणि जगदीश थोरात यांनी घेतले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600