जिल्हा

अवजड कंटेनर पडला १० फूट खोल खड्ड्यात

अवजड कंटेनर पडला  १० फूट खोल खड्ड्यात
अवजड कंटेनर पडला १० फूट खोल खड्ड्यात फोटो: ठाणे वैभव
घोडबंदर मार्गावर भीषण अपघात
ठाणे : मेट्रो प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या सुमारे १० फूट खोल खड्ड्यात २५ टन वजनाचा मालवाहू कंटेनर उलटला. या अपघातात कंटेनर चालक वाहनामध्ये अडकला होता. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला कंटेनरमधून बाहेर काढले. घोडबंदर येथील मानपाडा भागात  ही दुर्घटना घडली.
जेएनपीए बंदरातून गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गावरून जात असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत मानपाडा येथे पाण्याच्या टाकीसाठी सुमारे १० फूट खोल खड्डा खणला होता. रविवारी सकाळी जेएनपीए बंदरातून गुजरातच्या दिशेने कंटेनर वाहतूक करत होता. हा कंटेनर सकाळी ६च्या सुमारास मानपाडा भागात आला असता, चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर खोल खड्ड्यात कोसळला. या कंटेनरमध्ये २५ टन वजनाची भंगारातील वाहनाची चाके होती.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिकेतील डाॅक्टर, चितळसर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे कंटेनर चालक अमित यादव (३०) हा कंटेनरमध्ये अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला कंटेनरमधून बाहेर काढले. रुग्णवाहिकेतील डाॅक्टरांनी त्याला प्राथमिक उपचार करुन चितळसर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव खड्ड्याभोवती अडथळे उभारण्यात आले आहेत. तर कंटेनरला बाहेर काढण्याचे कार्य पथकांकडून सुरु होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600