जिल्हा

बदलापुरात महाविकास आघाडीला मिळणार वंचित, मनसेची साथ

बदलापूर: कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीही सज्ज होऊ लागली असून मविआने समविचारी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली असून त्याला मनसे व वंचित बहुजन आघाडीचीही साथ मिळणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. बदलापूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय (आर. के), भारत मुक्ती मोर्चा व भारत राष्ट्र समिती (बीआरएस) यांनाही महाविकास आघाडीत सामावून घेतले जाणार आहे. स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर जाईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी सांगितले. तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षालाही आघाडीत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी सांगितले. खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनीही येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार म्हात्रे यांच्या बदलापुरातील जनसंपर्क कार्यालयात सुरू होती. या बैठकीला काँग्रेसचे संजय जाधव, हरिश्चंद थोरात, लक्ष्मण कुडव, राष्ट्रवादीचे अविनाश देशमुख, कालिदास देशमुख, हेमंत रुमणे, शिवसेनेचे किशोर पाटील, प्रशांत पालांडे, स्वप्नील राजेशिंदे, मनसेचे संगीता चेंदवणकर, निशांत मांडविकर, वंचित बहुजन आघाडीचे अमर भरीत, दत्ता गायकवाड, सतीश तायडे, मिलिंद वानखडे, आरपीआय (आर के) चे सुनील दुपटे, बीआरएस पक्षाचे श्री. ओटले आदी उपस्थित होते. उद्या शुक्रवारपर्यंत महाविकास आघाडीचे प्रभागनिहाय उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600