जिल्हा
महापौर आरक्षण सोडत गुरुवारी
महापौर आरक्षण सोडत गुरुवारी
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मागिल अनेक दिवस रखडलेल्या ठाणे महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षण पदाची सोडत गुरुवार २२ जानेवारी रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक विभागाने जाहीर केले आहे.
ठाणे महापालिकेत मागिल तीन वर्षापासून महापौर पद नाही. महापालिका निवडणूक होण्यापुर्वी महापौर पदाची सोडत काढली जाते, परंतु राज्यातील २९ महापालिकांचे आरक्षण काढण्यात आले नव्हते. त्यामुळे या महापालिकांमध्ये कोण महापौर होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. राज्याच्या नगरविकास विभागाचे राज्यमंत्री यांच्या हस्ते २२जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी रोटेशन पद्धतीने आरक्षण काढले जाणार नाही, त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या महापालिकेत खुल्या वर्गाचा महापौर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरक्षण सोडत काढल्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे त्यामुळे महापौर पदाची निवडणूक पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600