जिल्हा

मुंबई, नागपूरला दुहेरी विजतेपदाची संधी

मुंबई, नागपूरला दुहेरी विजतेपदाची संधी
मुंबई, नागपूरला दुहेरी विजतेपदाची संधी फोटो: ठाणे वैभव
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ कोल्‍हापूर, पुणे, नाशिक, लातूर अंतिम फेरीत बदलापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यजमान मुंबईसह नागपूर विभागाने दोन गटात अंतिम फेरीत धडक मारली असून कोल्‍हापूर, पुणे, नाशिक, लातूर विभागही विजेतेपदासाठी सज्‍ज झाले आहेत. बदलापूर जिमखाना मैदानावर सुरू असलेल्‍या राज्य व्हॉलीबॉल स्‍पर्धेचा चौथा दिवस यजमान मुंबई व नागपूर विभागाने गाजवला. २१ वर्षांखालील दोन्‍ही गटात मुंबईने तर १८ वर्षांखालील दोन्‍ही गटात नागपूरने अंतिम फेरीत मुसंडी मारत दुहेरी विजेतेपदाकडे वाटचाल कायम राखली आहे. स्‍पर्धेच्‍या प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढत असून चौथ्या दिवशी आमदार किसन कथोरे यांनी स्‍पर्धेला भेट दिली. माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, नगरसेवक किरण भोईर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, विश्वकरंडक खोखो विजेती रेश्मा राठोड आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. विद्युत प्रकाशझोतात रंगलेल्‍या स्‍पर्धेत २१ वर्षांखालील मुलांच्‍या गटातील उपांत्‍य लढत मुंबई विरुद्ध कोल्हापूर संघाची उपांत्‍य लढत चौथ्या सेटपर्यंत रंगली. 25- 14, 25- 20, 15- 25, 27- 25 गुणांनी मुंबईने आपले वर्चस्‍व प्रस्‍थापित करीत अंतिम फेरीकडे कूच केली. जीवक वाघमारेने आक्रमण, रूद्र वरूणच्‍या अष्टपैलू खेळाच्‍या जोरावर मुंबईने चौथा सेट जिंकत मैदान गाजवले. २१ वर्षांखालील मुलीच्‍या गटातील नाशिक विरुद्ध पुणे लढत शेवटच्‍या मिनिटापर्यंत अटीतटीची झाली. पहिल्या दोन सेटमध्ये नाशिक विभाग 17- 25, 13- 25 गुणांनी मागे होता. कच न खाता तुफानी खेळ करत 25- 14, 25- 16, 16- 14 गुणांनी ३ सेट जिंकत नाशिक गटाने लक्षवेधी कामगिरी करीत प्रेक्षकांची मने जिंकली. गतविजेत्‍या नाशिककडून हिमांशी ओतारी, साक्षी गुलदगड व स्वरा देवघरेने वेगवान खेळ करीत अंतिम फेरीत मजल मारली आहे. अंतिम फेरीत नाशिकची झुंज तुल्‍यबळ मुंबई संघाविरुद्ध होईल. मुलांच्‍या १८ वर्षांखालील गटात कोल्हापूरने लातूरचा 25- 20, 25- 13, 25- 18 गुणांनी तर नागपुरने पुणे विभागाचा 25- 13, 25- 22, 30- 32, 25- 15 पराभव करत अंतिम फेरी गाठली. नागपूरच्‍या वत्‍सल्‍य किरटकर, कृष्णा तडसे व कर्मण्य चिलकुलवारने झटपट गुण वसूल करीत चौथ्या सेटमध्ये सामना जिंकत अंतिम फेरीचे द्वार संघासाठी खुले केले. मुलींच्‍या गटात पुणे विभागाने गतविजेत्‍या लातूरचा 25- 23, 25- 20, 25- 23 सरळ सेटमध्ये पराभव केला. कार्तिकी गरगडे, तन्वी साळंके व समृद्धी चांदगडेच्‍या खेळामुळे पुणे संघाने शेवटपर्यंत झुंज देत मैदान मारले. आता पुणे संघ अंतिम फेरीत दाखल झाला असून नागपूर विरुद्ध सामना रंगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते होणार आहे. पाच दिवस चाललेल्‍या या स्‍पर्धेत राज्‍यतील ८ विभागातील ३८४ खेळाडूंचा थरार रंगला. स्‍पर्धेतील विजेत्‍यांना २३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे व करंडक, पदके देणार येणार आहे अंतिम लढती पुढीलप्रमाणे २१ वर्षांखालील मुले - लातूर विरुद्ध मुंबई २१ वर्षांखालील मुली - नाशिक विरुद्ध मुंबई १८ वर्षांखालील मुले - कोल्हापूर विरुद्ध नागपुर १८ वर्षांखालील मुली - पुणे विरुद्ध नागपूर

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600