जिल्हा

चौघुले स्पोर्ट्सचा पाठलाग करण्यात मुंबई पोलीस अपयशी

चौघुले स्पोर्ट्सचा पाठलाग करण्यात मुंबई पोलीस अपयशी
चौघुले स्पोर्ट्सचा पाठलाग करण्यात मुंबई पोलीस अपयशी फोटो: ठाणे वैभव
रोहित पोळची एकाकी लढत ठाणे: मुंबई पोलीस संघाच्या रोहित पोळ याच्या ९४ धावांच्या तडाखेबंद फलंदाजीचा नमुना सेंट्रल मैदानाने अनुभवला. त्याची ही लढत मात्र एकाकी ठरली आणि चौघुले स्पोर्ट्स क्लबने ४५ धावांनी सामना खिशात घातला. ठाणेवैभव करंडक स्पर्धेच्या अ गटातील उपांत्य फेरीचा सामना मुंबई पोलीस विरुद्ध चौघुले स्पोर्ट्स क्लब असा झाला. यावेळी नाणेफेकीचा मान ज्येष्ठ प्रशिक्षक डॉ. शेखर धुरी यांना मिळाला. चौघुले स्पोर्ट्स क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय फलंदाजांनी सार्थ ठरवला. साहिल जाधव याने चार षटकार आणि चार चौकरांच्या मदतीने ६२ धावा फटकावल्या. त्या पाठोपाठ अजय जैस्वाल ३८, जितेश राऊत आणि पार्थ चंदन यांच्या प्रत्येकी ३७ धावा आणि तुषार सिंग याच्या ३१ धावांच्या बळावर चौघुले स्पोर्ट्स क्लबने २५३ धावांचा डोंगर उभा केला. मुंबई पोलीस संघाच्या योगेश शिंदे याने ३१ धावांच्या बदल्यात चार गडी बाद केले, तर रोहन सोनावळे याने ४४ धावा देत तीन फलंदाज गारद केले. चौघुले स्पोर्ट्सचे आव्हान पेलताना मुंबई पोलीस संघाचा रोहित पोळ वगळता सारेच फलंदाज ढेपाळले. सहा फलंदाजांनी वैयक्तिक एक आकडी धावसंख्या केली तर एका फलंदाजाला खातेही उघडता आले नाही. एकमेव रोहित पोळ याने पाच षटकार आणि आठ चौकार ठोकत ९४ धावा केल्या, तर मानसिंग चव्हाण याने एक षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. रोहित पोळची ही लढत एकाकी ठरली आणि ३२.२ षटकांत २०८ धावा करत संपूर्ण मुंबई पोलीस संघ तंबूत परतला. चौघुले स्पोर्ट्स क्लबकडून तनिष सावे, रोहित यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. साहिल जाधव सामनावीर ठरला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600