जिल्हा

जिल्ह्यात 'नोटा'चा पाऊस

४७,२४२ मतदारांना सारेच उमेदवार नापसंत ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत ४७,२४२ मतदारांनी नोटाला पसंती देऊन उमेदवारांना नाकारले आहे. शहापूर मतदारसंघात सर्वाधिक ४,८९२ मतदारांनी नोटाला मतदान केले आहे तर ओवळा-माजिवडा मतदारसंघात ४१९३ मतदारांनी नोटाला पसंती देत दुसरे स्थान पटकावले. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात ७२ लाख २९,३३९ मतदार असून ५६. ८७ टक्के मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यावर्षी २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावण्यासाठी उतरले होते. मागिल विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ४९.०२ टक्के इतके मतदान झाले होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ५६.९३ इतके टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील १८ जागांपैकी १६ जागा मिळवून महायुतीने निर्विवाद बहुमत मिळवले आहे परंतु सुमारे ४७ हजारहून अधिक मतदारांनी नकारात्मक मतदान करून सध्या सुरु असलेल्या राजकीय गोंधळाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघात ६८.३२ टक्के इतके मतदान झाले असले तरी, दुसरीकडे याच मतदारसंघात नोटाला जिल्ह्यातील सर्वाधिक ४,८९२ इतके मतदान झाले. तर, सर्वात कमी भिवंडी पूर्वमध्ये ७३८ इतके नोटाला मतदान झाले आहे. ओवळा माजिवडा मतदारसंघातही ४,१९३ इतके मतदान नोटाला झाले. तर, मुरबाड मतदारसंघात नोटाला ३,९५२ इतके मतदान झाले. मुरबाडमध्ये एकूण ६४.९२ इतके मतदान झाले होते. जिल्ह्यात मतदारसंघनिहाय नोटा शहापूर: ४८९२ ओवळा-माजिवडा: ४१९३ मुरबाड: ३९५२ कल्याण पश्चिम: २७७४ डोंबिवली: २७४५ कल्याण ग्रामीण: २७३४ ऐरोली: २७०८ ठाणे: २६९४ मुंब्रा-कळवा: २६७९ कोपरी-पाचपाखाडी: २६७६ बेलापूर: २५८८ भिवंडी ग्रामीण: २५७१ अंबरनाथ: २३१६ मीरा-भाईंदर: २२७९ कल्याण पूर्व: १८७२ उल्हासनगर: १७५९ भिवंडी पश्चिम: १०७२ भिवंडी पूर्व: ७३८

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600