संपादकीय
चोरीचा मामला, मोठ्याने बोंबला!
चोरीचा मामला, मोठ्याने बोंबला!
फोटो: ठाणे वैभव
सार्वजनिक पैशाची जबाबदारी वि श्वस्त या नात्यान े घेतली तर त्याचा अपहर करण्याची दर्बुु द्धी होणार नाही. परंतु हा वि चार तथाकथित वि श्वस्तांना शिव त नसल्यामुळे
गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार फोफावत राहतो. सरकारी व्यवस्था अशा बेकायदा व्यवहारांची तळी बनली असतानाच अयोध्येच्या राम मंदिरातील पैशांची चोरी उघडकीस आली आहे! यामुळे देशभर गदारोळ उडाला आहे. अयोध्येचे राम मंदिर भारताची नव ीन ओळख म्हणून प्रस्थापित होत असताना कि मान ही वास्तू तरी अनैति कतेच्या
पाशातून मुक्त राहील ही अपेक्षा फोल ठरली आहे. नाही म्हणायला प्रार्थन ा स्थळांतील दानपेट्यातून पैसे लंपास होण्याच्या, हि शेबात अनियमितता आढळण्याच्या आणि अनेकदा देव आणि त्याच्या अंगावरचे दागिन े चोरीला जाण्याचे प्रकार अधूनमधून घडत असतात. परंतु अयोध्येचे राम मंदिर विशेष चर्चेत आले कारण ते थेट सत्तारूढ पक्षाशी संबंधि त आहे म्हणून.
जो प्रकार घडला तो कोणत्याही परिस्थितीत समर्थन ीय नाही. प्रश्न मग उपस्थित राहतो तो सार्वजनिक जीवन ातील व्यवहारांचा, ते हाताळणाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा, पापभि रूपणाचा, असा गुन्हा करणे आणि तो उघडकीस आल्याव र होणाऱ्या परिणामांबद्दल निर्ढावलेपण आल्याचा. भारतीय समाज हा नीतिमत्तेच्या मूल्यांवर आधारित असताना त्याचा पाया इतक्या झपाट्यान े ढासळू लागायची कारणे शोधून त्याव र तातडीने उपाय शोधण्याची जबाबदारी कोणी घेणार आहे की नाही? भ्रष्टाचार सर्वपक्षीय आणि आता तर सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक झाल्यान े कोणत्याच राजकीय पक्षान े त्याव र राजकीय पोळी भाजून घेता कामा नये! तो नैति क अधि कार आज तरी कोणाकडेच राहि लेला नाही. वि रोधी पक्षांच्या आंदोलनांन ा आणि त्यांच्यातर्फे होणाऱ्या टीके ला जनता फारसे गांभीर्यान े घेईल असे वाटत नाही. याप्रकरणी मंदिर न्यासातर्फे संबंधितांवर कडक कारवाई आणि व्यवहारात पारदर्श कता आणण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. ज्या त्रुटी म्हणा कि ं वा पळवाटा (चोरवाटा, शब्द अधि क समर्पक ठरावा!) आहेत त्या दरू करण्याचे काम करावे लागेल. अर्था त त्यासाठी जे आरोप होत आहेत ते कबूल करणे प्रस्तुत होईल. त्यांचे खंडण करणे म्हणजे आरोप नाकारणे आणि आरोपींची पाठराखण करण्यासारखे होईल. अशावेळी ही घटना राजकीय परिपेक्षाबाहेर ठेवणे उचित ठरेल. जि तके राजकारण येईल ति तकी कारवाई आणि सुधारणा यांच्या शक्यता दुर्मि ळ होतील.
देवावरची श्रद्धा अशा चोऱ्यांमुळे कमी होत नसते. देशातील भ्रष्टाचाराने माफ करा कळस गाठला असला तरी देवासमोर हात जोडून उभे राहणारे, प्रसंगी काही न मागणारे, उलटपक्षी आभार मानणारे आणि सर्वांसाठी सदस् द्विवेकबुद्धीची प्रार्थन ा करणारे कमी नाहीत. ते दानपेट्यांची चोरी झाली म्हणून तसूभरही मागे हटणार नाहीत. त्यांची श्रद्धा पैशांत कि ंवा सोन्या-चांदीत मोजता येणार नसते. त्यामुळे ती चोरीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एक मात्र खरे की अशा श्रद्धाळूंमधून काही जणांची बुद्धी फि रते तेव्हा देश म्हणून जे चारित्र्य असते त्याबद्दल मात्र चितं ा वाटू लागते. देव आणि देश यामध्ये चितं ेचा हा अडथळा भक्कम अशा मूल्याधिष् ठित समाजाचा ढाचा पाडू शकतो, हा खरा धोका आहे. हा धोका राजकारणापलीकडे जाऊन वि चार केला तर परतवता येऊ शके ल. देवावरची निस्सीम भक्ती गलि च्छ राजकारणात तोलण्याची चूक करण्यापेक्षा सार्वजनिक जीवन ात वावरणाऱ्या प्रत्येकाने आपापले हात बरबटले जाणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे.
सत्तेच्या राजकारणात पैशांचा जो सुळसुळाट सुरू आहे तो खचितच उदीतून तयार होत नाही. तसे कोणास वाटत असेल तर तो अंधश्रद्धेला मान्यता देत आहे. राजकारणात आलेली बेहि शेबी संपत्ती ही शंभर टक्के पापातून निर्मा ण झाली असताना, त्याचा दानपेटीशी संबंध लावणे चुकीचे होईल. प्रत्येक पक्षाचे एक दकु ान झाले आहे आणि नेते दकु ानदार कमी आणि देव अधि क झाले आहेत. हे देवत्व बहाल करणाऱ्या जनतेने त्याचा फेरवि चार करायला हवा. अन्यथा अशा देवांसमोरील दानपेट्या ठेकेदारांच्या मदतीने ओसंडून वाहत राहणार आहेत. ही सरकारी (करदात्यांचा पैसा) लूट करणाऱ्या चोरांचा बंदोबस्त करायला लागेल. तसे झाले तरच रामराज्य येईल. अन्यथा चोर सज्ज आहेतच दानपेट्यांव र डल्ला मारायला!
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600