जिल्हा
ठामपाच्या ६२ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती
ठामपाच्या ६२ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणी (गट-ड) या संवर्गातील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती देण्यात यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार ६२ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना लिपिक तथा टंकलेखक या पदावर पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले आहेत.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी देखील प्रशासनासोबत वारंवार पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांनी सकारात्मक भूमिका घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे काम तातडीने करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते.
आज महापौर दालनात महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरुपात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले. यावेळी उपायुक्त मनिष जोशी, जी.जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, आस्थापना अधीक्षक राधिका कांबळे व कर्मचारी उपस्थित होते.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण या सर्वानी केलेल्या सहकार्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे. या पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600