जिल्हा

बोहल्यावर चढण्यापूर्वीच रोशनीने घेतला जगाचा निरोप

कल्याण : उपवर झालेल्या हवाई सेविका रोशनी सोनघरे हिच्या विवाहाची तयारी कुटुंबियांनी सुरू केली होती. ठाण्यातील एका उच्चशिक्षित तरुणाशी तिचा विवाह होणार होता. मात्र त्याआधीच अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत तिचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई-वडिल आणि भाऊसोबत राहत होती. तिचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते. मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झाले होते. रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खाजगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांच्या पत्नी राजश्री यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. रोशनीला लहानपणापासूनच क्रू बनायचं होतं. तिने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिचे स्वप्न पूर्ण केलं. बुधवारी आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ती लंडनच्या दिशेने निघाली होती. मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोशनीचा मृत्यू झाला. सध्या तिच्या घराजवळ तिच्या नातेवाईक आणि डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी देखील तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांना धीर दिला. रोशनीचे मामा प्रवीण सुखदरे यांनी प्रसारमाध्यमांना रोशनीचा संघर्ष कसा होता याबाबत माहिती दिली. रोशनी आमच्या अंगाखांद्यावर मोठी झाली आहे. मध्यमवर्गीय कुटूंबातून 10 बाय 10 च्या घरातून वन बीएचकेमध्ये आली. एयर होस्टेस बनण्याची तिची इच्छा होती. तिच्या आई-वडिलांनी खूप कष्ट केले, तिने प्रयत्न केले आणि तिचे स्वप्न तिने पूर्ण केले. रोशनी ही स्पाईस जेटमध्ये होती. त्यानंतर दोन वर्षापूर्वी एयर इंडियामध्ये रुजू झाली. चार दिवसांपूर्वी गावी आली होती, सगळ्यांना भेटली. कुलदेवतेचे दर्शन घेतले, असे प्रवीण सुखदरे यांनी सांगितले. तर रोशनीचे काका दत्ता सोनघरे यांनी सांगितले कि, अपघात अहमदाबादला झाला त्यामुळे सुरुवातीला माहिती मिळत नव्हती, तरीही दिलेल्या नंबरवर आम्ही फोन केले, मात्र सखोल माहिती मिळत नव्हती. रात्री डीएनए सॅम्पल घेतले आहेत. मात्र डीएनएचा अहवाल येण्यासाठी दोन-तीन दिवस जातात, 72 तासांची वेळ त्यांनी आम्हाला दिली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिचा साखरपुडा आणि मार्चमध्ये तिचं लग्न करायचं होतं. मुलगा बघितला होता, बोलणी झाली होती. आम्ही हॉल पण शोधत होतो, मात्र याच दरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती रोशनीचे काका दत्ता सोनघरे यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600