जिल्हा
अव्वल विद्यार्थ्यांच्या यादीत ठाण्याची सुरभी रानडे झळकली
अव्वल विद्यार्थ्यांच्या यादीत ठाण्याची सुरभी रानडे झळकली
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: सीबीएसई दहावीच्या परीक्षेत इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूलच्या सुरभी रानडे हिने ९९.६ टक्के गुण मिळवत महाराष्ट्रातील अव्वल विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले आहे.
ठाण्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल दैदिप्यमान लागला असून सुरभी रानडे हिने ९९.६ टक्के गुण मिळवत ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याचबरोबर सई खेडेकर व संकल्प शिंदे यांनी प्रत्येकी ९६.६टक्के गुण मिळवले, तर श्रेयस खुले याने ९६टक्के गुण प्राप्त केले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी उच्च श्रेणीत उत्तीर्ण होत आपल्या गुणवत्तेची ठळक छाप पाडली.
विद्यालयाचा एकूण निकालही उच्च टक्केवारीत लागला असून मोठ्या संख्येने विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शैक्षणिक दर्जाची साक्ष दिली आहे.
या निकालाबाबत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निकिता कोठारी म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या चिकाटी, परिश्रम आणि जिद्दीचे फलित आहे. शिक्षक, विषयप्रमुख आणि समन्वयक यांच्या समर्पित कार्यामुळेच हा उत्कृष्ट निकाल शक्य झाला. पालकांचे सहकार्यही अत्यंत मोलाचे ठरले आहे. भविष्यातही अशाच उज्ज्वल यशाची अपेक्षा आहे.”
यावेळी उप मुख्याध्यापिका दीपाली मढवी, रुचा कळंबकर आणि सर्व शिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600