जिल्हा

स्विगी, झोमॅटो, ब्लिनकीटचे दर वाढणार?

स्विगी, झोमॅटो, ब्लिनकीटचे दर वाढणार?
स्विगी, झोमॅटो, ब्लिनकीटचे दर वाढणार? फोटो: ठाणे वैभव
इंधन दरवाढीमुळे गिग कामगारांची प्रती किलोमीटर २० रुपयांची मागणी मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर, गिग अँड प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियनने ॲप-आधारित कामगारांसाठी प्रति-किलोमीटर सेवा दरात २० रुपयांची वाढ करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शुक्रवारपासून प्रतिलिटर किमान तीन रुपयांची वाढ झाल्याने लाखो गिग कामगारांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत. जवळपास चार वर्षांतील ही पहिली मोठी राष्ट्रीय इंधन दरवाढ असून, या निर्णयामुळे देशातील सुमारे एक कोटी २० लाख गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांच्या जीवनावर थेट प्रतिकूल परिणाम होईल. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती, तसेच यापूर्वी एलपीजी सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे कामगारांवर मोठा आर्थिक दबाव आला आहे. त्यांच्या रोजंदारी वेतनाच्या रचनेत लवकरच बदल केला नाही, तर मोठ्या संख्येने गिग कामगारांना काम सोडावे लागू शकते असा इशाराही दिला आहे. ‘स्विगी, झोमॅटो, आणि ब्लिंक इटसारख्या कंपन्यांनी डिलिव्हरी आणि वाहतूक कामगारांसाठी प्रतिकिलोमीटर २० रुपये किमान सेवा दर निश्चित करण्याची मागणी केली आहे. ‘देशभरात कोट्यवधी गिग कामगार मोटरसायकल आणि स्कूटर चालवत, प्रचंड उष्णता आणि प्रतिकूल हवामानात अनेक तास काम करतात. वाढत्या इंधन दरांचा त्यांना सर्वाधिक फटका बसत आहे. कंपन्यांनी वितरण शुल्कात प्रमाणानुसार सुधारणा करण्याची मागणी केली आहे. इंधन, वाहनांची सर्व्हिसिंग आणि देखभाल खर्चासह वाढता परिचालन खर्च असूनही, कंपन्या डिलिव्हरी शुल्क आणि किलोमीटर-आधारित पेमेंटमध्ये प्रमाणानुसार सुधारणा करण्यात अपयशी ठरल्या आहेत. इंधन दरवाढ आणि त्यासोबतच यापूर्वीच एलपीजी सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे, वाढत्या महागाईशी आधीच झगडणाऱ्या कामगारांवरील आर्थिक दबाव अधिकच वाढला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600