जिल्हा
टेलीपरफॉर्मन्स आणि मुंबई पोलीस 'ब' विजयी
४७ वी ठाणेवैभव करंडक स्पर्धा
सुनील पाटील स्पर्धेतील दुसरा शतकवीर
ठाणे: दैनिक ठाणेवैभव आणि स्पोर्टिंग क्लब, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ४७व्या ठाणेवैभव करंडक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत अ गटात टेलीपरफॉर्मन्स आणि ब गटात मुंबई पोलीस ब संघाने विजय मिळवला.
दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये झालेल्या 'अ' गटातील पहिल्या फेरीत टेलीपरफॉर्मन्स ग्लोबल सर्व्हिसेसने मुंबई पोलीस 'अ' संघाचा ४१ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रियांक पटेल ७१ चेंडूत ५ चौकार आणि अजित यादव ६० चेंडूत सहा चौकार आणि एक षटकारासह प्रत्येकी ६३-६३ धावा फाटकावून टेलीपरफॉर्मन्सच्या डावाला आकार दिला. कैलास बाबरेने ३० धावात चार तर कैलास कोलेकरने ४७ धावात तीन विकेट्स घेतल्या. मुंबई पोलीस 'अ' संघाकडून चिंतामणी कांबळेने ५५ चेंडूत चार चौकारांसह ४३ तर कैलास कोलेकरने नाबाद ३२ धावा केल्या. अजित यादव सामनावीर ठरला.
सेंट्रल मैदानावरची 'ब' गटातील लढत एकतर्फी झाली. मुंबई पोलीस 'ब' संघाने ९ बाद २८६ धावांचा डोंगर रचला. सुनील पाटीलने ७४ चेंडूत १४ चौकार आणि तीन षटकारांसह झंजावाती शतकी (११७) खेळी केली. तनिश मेहेर ६८ आणि आर्यराज निकमने ४२ धावा केल्या. सारस्वत बँकेच्या गोलंदाजांची पिटाई होत असतानाही समीर भोइटेने ५७ धावांत सहा विकेट्स घेण्यात यश मिळवले. 'ब' गटातील ही एकतर्फी लढत मुंबई पोलीस 'ब' संघाने तब्बल १३९ धावांनी जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील आज दुसरे शतक साजरे झाले.
संक्षिप्त धावफलक
'अ' गट " टेलीपरफॉर्मन्स ग्लोबल सर्विसेस ३५ षटकात ७ बाद २११ (प्रियांका पटेल ६३, अजित यादव ६३, कैलास कोलेकर ७-०-४७-३, कैलास बाबरे ५-०-३०-४) विजयी विरुद्ध मुंबई पोलीस 'अ' ३५ षटकात ९ बाद ७० (चिंतामणी कांबळे ४३, कैलास कोलेकर नाबाद ३२, कथन पटेल ७-०-२२-३, अभय पटेल ७-०-३०-२, प्रशांत कदम ४-०-१८-२)
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600