जिल्हा
काशीगांवातील ट्रान्सफाॅर्मरला भीषण आग
भाईंदर: मिरारोड काशीगांव येथील ग्लोबल गॅलरी गॅरेजलगत असलेल्या अदानी वीज पुरवठा कंपनीच्या ट्रान्सफाॅर्मरला दुपारी आग लागली.
आगीची खबर मिळताच मीरा-भाईंदर महापालिका अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरूवात केली. मात्र गॅरेजमधील आॅईलच्या साठ्यामुळे आग आटोक्यात येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन अधिकाऱ्यांना यश मिळाले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600