जिल्हा
ठाण्यात जखमी गोविंदांची संख्या २३वर
ठाणे: शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या दहीकाला उत्सवात एकूण २३ गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
जखमींमध्ये १३, १६, १७ आणि १८ या वयोगटातील पाच गोंविदा असून उर्वरित गोविंदा हे २० वर्षांवरील आहेत. जखमी गोविंदांमध्ये १३ ठाणेकर, सहा मुंबईतील, विरारचे दोन, नवीमुंबई आणि कल्याण येथील प्रत्येकी एक-एक गोविंदाचा समावेश आहे.
जखमींमध्ये प्रामुख्याने गोविंदांच्या हाताला, छातीला, कमरेला दुखापत झाली आहे. यामध्ये एका महिला गोविंदाला तिच्या नातेवाईकांनी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेले असून उर्वरित गोविंदांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600