जिल्हा

बेरजेचे समाजकारण का होऊ नये?

गोवर्धन भगत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपादक मिलिंद बल्लाळ यांचा सवाल ठाणे: बेरजेचे राजकारण होत असेल तर समाजकारणही बेरजेचे व्हायला काय हरकत आहे, असा प्रश्न 'ठाणेवैभव' चे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी उपस्थित केला. “अष्टपैत्रू दादा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे नुकताच झाला. त्यावेळी श्री.बल्लाळ बोलत होते. यावेळी सोहळ्यास ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. श्रीपाल सबनीस हे ही उपस्थित होते . ते पुढे म्हणाले, ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करीत असल्याचा दावा अनेक जण करीत असतात. परंतु त्याचे परिणाम दिसत नाहीत. राजकारणाचा अतिरेक समाजाला घातक ठरू शकतो, असेही श्री. बल्लाळ म्हणाले. याप्रसंगी श्रीपाल सबनीस यांचेही भाषण झाले. माजी मंत्री जगन्नाथ पाटील, प्रकाशक व लेखक मिलिंद कसबे, कीर्तनकार ह .भ .प विश्‍वनाथ महाराज वारिंगे यांचेही भाषण झाले. 'अष्टपैत्रू दादा' या पुस्तकाचे लेखक, अभिनेते व दिग्दर्शक राम माळी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास दादांच्या पत्नी इंदुमती भगत, माजी आमदार सुभाष भोईर, प्रकाश भोईर, अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे, माजी नगरसेवक देवराम भोईर, सामाजिक कार्यकर्ते रियाज शेख, शबनम शेख, दिवा हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय महाजन, विनोद भगत, रेश्मा पवार आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600