जिल्हा

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
महावितरणचा हलगर्जीपणा उल्हासनगर: उल्हासनगरच्या पंजाबी कॉलनी परिसरात राहणारा १७ वर्षीय आयुष रॉय ह्या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे, या घटनेनंतर कुटुंबीयांनी महावितरणच्या विरोधात आरोप केले आहे, एटीपी हायस्कूलजवळ रॉय कुटुंब वास्तव्यास आहे, दोन दिवसांपूर्वी रॉय यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. याविषयी त्यांनी संबंधित महावितरण कार्यलयात तक्रार दाखल केली होती, परंतु दुरुस्ती न झाल्याने आज आयुष रॉय हा तरुण पत्र्यावर चढून वायरचे निरीक्षण करीत होता. यावेळी तारेच्या संपर्कात येऊन त्याला जोरदार धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. याविषयी रॉय कुटुंबियांनी महावितरणच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600